मुंबईतील (mumbai) भांडुप (bhandup) येथे एका 34 वर्षीय महिलेला 3 ते 4 दिवसांपासून डाव्या कानात सूज (swelling) येत होती. तसेच सूज आलेल्या ठिकाणी वेदनाही (pain) होत होत्या. डॉ. शीतल राडिया, ईएनटी सर्जन यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर तिने पुढील 3 दिवस तोंडावाटे औषधे घेतली. परंतु वेदना कमी झाल्या नाहीत आणि सूज आणखीन वाढली.
यानंतर महिलेला पुढे डॉ. हार्दिक ठक्कर, एमडी फिजिशियन आणि एपेक्स हॉस्पिटल मुलुंडचे संसर्गजन्य रोग तज्ञ (ENT surgeon) यांच्याकडे पाठवण्यात आले. .
डॉ. हार्दिक ठक्कर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली तिला पुढील उपचारांसाठी मुलुंड (mulund) येथील एपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या दुर्मिळ वैद्यकीय प्रकरणाविषयी अधिक माहिती देताना डॉ. हार्दिक ठक्कर म्हणतात, “आम्ही तिला दाखल केले कारण पेरी ऑर्बिटल भागात मोठी सूज आली होती, म्हणून आम्ही IV अँटीबायोटिक्स आणि इतर औषधांनी उपचार करण्याचा निर्णय घेतला.
मेंदू आणि कानाचा (ear) एमआरआय करण्यात आला. शस्त्रक्रियेद्वारे पू काढून टाकण्यात आला आणि चाचण्यांसाठी पाठवण्यात आला. चाचण्यांमधून असे आढळून आले की, महिलेच्या कानातील संसर्ग हा टीबी बॅक्टेरियामुळे झाला होता.
मुंबईतील हे एक अत्यंत दुर्मिळ प्रकरण आहे. तसेच डॉक्टरांच्या माहितीनुसार मुंबईत आढळलेली ही पहिली केस आहे. मलेशियामध्ये यापूर्वी अशी काही प्रकरणे नोंदवली गेली होती.
ॲटिपिकल मायकोबॅक्टेरिया किंवा नॉन-ट्यूबरकुलस मायकोबॅक्टेरियामुळे त्वचा आणि मऊ ऊतींचे संक्रमण, लिम्फॅडेनेयटीस, फुफ्फुसाचा संसर्ग, प्रसारित संसर्ग आणि क्वचितच आढळणारे संक्रमण यासारखे विविध रोग होतात.
डॉक्टरांच्या माहितीनुसार महिलेला 3 दिवस टीबीचे औषध देऊन उपचारास सुरुवात केली. तसेच 3 दिवसांच्या उपचारानंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आला आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती बरी आहे.”
हेही वाचा