साईच्छा मंडळ समाजसेवेत अग्रेसर

वरळी - भजन, कीर्तन म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ज्येष्ठ मंडळी. पण वरळीतल्या साईच्छा भजन मंडळात तरुणाईचा उत्साहसुद्धा दिसतो. हे भजनी मंडळ आता 10 वर्षांचं झालंय. या भजनी मंडळाचं वेगळेपण म्हणजे, मंडाळाची सुरुवात झाली, ती एका आरतीपासून.

एका ढोलकीसह सुरू झालेलं हे मंडळ पुढेच जात राहिलं. आज मोठ-मोठी वाद्यं मंडळाकडे आहेत. गणेशोत्सव आणि नवरात्र मंडळांच्या पसंतीलाही मंडळ उतरलंय. पण फक्त भजन-कीर्तनच नव्हे तर सामाजिक कार्यातही अग्रेसर राहण्याचा प्रयत्न हे मंडळ नेहमीच करतंय आणि त्यामुळेच इतरांपेक्षा वेगळंही ठरतंय.

Loading Comments