समाजकल्याणमंत्र्यांची बालगृहाला भेट

 Mandala
समाजकल्याणमंत्र्यांची बालगृहाला भेट

मानखुर्द - चिल्ड्रन्स होम या गतिमंद मुलांच्या बालगृहात 3 महिन्यांत 6 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक राजकीय व्यक्तींनी या बालगृहाला भेटी दिल्या होत्या. मात्र एकही मंत्री या बालगृहातली परिस्थिती जाणून घेण्यासाठी इथे फिरकले नव्हते. अखेर गुरुवारी सायंकाळी राज्याचे समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी या बालगृहाला भेट देऊन इथली परिस्थिती जाणून घेतली. या वेळी त्यांनी या बालगृहाच्या सर्व विभागांची सविस्तर पाहणी करत अधिकाऱ्यांकडून त्या-त्या विभागाची इत्यंभूत माहिती घेतली. याशिवाय बालगृहातल्या मुलांच्या आहाराविषयी, त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था कशी केली जाते, रुग्णालयाची स्थिती, इथे आजारी असलेल्या रुग्णांची अवस्था अशी सविस्तर माहिती घेतली आणि या बालगृहात अनेक गैरसोयी असल्याचं मान्य केलं. याबाबत त्या त्या विभागाला सूचना करणार असल्याची प्रतिक्रियाही बडोले यांनी दिली.

Loading Comments