Advertisement

अंगारकी संकष्टीला सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाताय? मग हे वाचा


अंगारकी संकष्टीला सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाताय? मग हे वाचा
SHARES

मंगळवारी ७ नोव्हेंबरला अंगारकी संकष्ट चतुर्थी असल्याने मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात सहाजिकच भाविकांची गर्दी होणार. त्यामुळे नेहमीप्रमाणे यंदाही कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून विषेश सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे. मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी अंगारकी संकष्टीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांच्या दर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत.



कधी घेता येणार दर्शन

सोमवार ता. ६ नोव्हेंबर मध्यरात्री १.३० ते मंगळवारी ता. ७ नोव्हेंबर पहाटे ३.१५ वाजेपर्यंत. ७ नोव्हेंबर पहाटे ३.५० ते रात्री ८ वाजेपर्यंत तसेच आरतीनंतर ९.३० ते १२ यावेळेत भाविकांना बाप्पाचं दर्शन घेता येईल.


महिला, पुरुषांसाठी मुखदर्शन व्यवस्था

एस.के बोले मार्गावरील आगार बाजार ते सिद्धी ओरवेशद्वार या दरम्यान उभारण्यात आलेल्या रेलिंगमधून भाविकांना सोमवार ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १.३० वाजल्यापासून मंदिर प्रवेश द्वार क्र. १ मधून प्रवेश दिला जाईल.



पुरुषांसाठी 'अशी' असेल रांग व्यवस्था

शंकर घाणेकर मार्ग, जय भारत हॉटेल पदपथ, रचना संसद कॉलेज, रवींद्रनाट्य मंदिर कलांगण येथील मंडप, सानेगुरूजी उद्यान प्रवेशद्वार येथून सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १.३० वाजल्यापासून मंदिर प्रवेशद्वार क्र.४ द्वारे बाप्पाच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी भाविकांना प्रवेश दिला जाईल.


महिला भाविकांसाठी रांग व्यवस्था

शंकर घाणेकर मार्ग सिल्व्हर अपार्टमेंट प्रवेशद्वार पदपथ, काकासाहेब गाडगीळ मार्गवरील अंकुर सोसायटी पदपथ, कॉन्व्हेंट हायस्कूल कामना सोसायटी पदपथ येथून सोमवार ६ नोव्हेंबर मध्यरात्री १.३० वाजल्यापासून रिद्धी प्रवेशद्वार क्रं. ७ मधून बाप्पाच्या दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल.



अपंग, जेष्ठ नागरिक, गर्भवती महिला, ३ महिन्यांच्या आतील लहान बालके आदींकरता रांग व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या बाहेरील पदपथावरून सिद्धिविनायक पोलीस चौकीच्या मागील सानेगुरुजी उद्यान येथे उभारण्यात येणाऱ्या मंडपातून ६ नोव्हेंबर मध्यरात्री १.३० वाजल्यापासून रिद्धी प्रवेशद्वार क्र ४ मधून बाप्पाच्या दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल.


मोफत वातानुकूलित बस सेवा

न्यासातर्फे बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरता ६ नोव्हेंबरच्या रात्री १२ ते मंगळवारी ७ नोव्हेंबर रात्री १२ पर्यंत कबुतरखाना दादर ते रवींद्रनाट्य मंदिरदरम्यान मोफत वातानुकूलित बससेवा ठेवण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा