Advertisement

सैनिक हो, तुमच्यासाठी...!


सैनिक हो, तुमच्यासाठी...!
SHARES

मुलुंड - जवानांच्या शौर्यगाथा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी शनिवारी मुलुंडमधील मराठा भवन येथे एका व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. निर्भया ग्रुप आयोजित या व्याख्यानमालेत भारतीय जवानांच्या शौर्यगाथा गायल्या गेल्या. कारगिल युद्धातील अनेक उदाहरणे देऊन जवानांचा खरा पराक्रम तरुणाईपुढे मांडण्यात आला. या वेळी तरुणाईला सैन्यात भरती होण्याचे आवाहनही करण्यात आले.

'आजच्या पिढीला जवानांचे मौल्यवान योगदान कळावे तसेच त्यांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे' अशी प्रतिक्रिया लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा