... म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा दिन

आतापर्यंत केंद्रानं तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांना अभिजात दर्जा दिलाय. मराठी भाषेलाही अभिजात दर्जा मिळवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत.

SHARE

'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' ही रचना आपण मराठी भाषा दिनाला अगदी अभिमानानं गातो. प्रत्येक मराठी माणूस हा दिवस साजरा करतो. सोशल मीडियावर भाषा दिनानिमित्त शुभेच्छा, कविता, मेसेजेस असं बरंच काही शेअर केलं जातं. पण मराठी भाषा दिन हा २७ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? किंवा मराठी भाषा दिन का? आणि केव्हापासून साजरा केला जातो? हे आजही अनेकांना माहित नाही. पण आज यासंदर्भातच आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.


यांच्यामुळे साजरा होतो 

२७ फेब्रुवारी या दिवशी वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. त्यानिमित्तानं हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर होतं. एक श्रेष्ठ मराठी कवी, नाटटकार आणि कादंबरीकार म्हणून कुसुमाग्रज ओळखले जातात. कुसुमाग्रज या नावानं ते काव्यलेखन करायचे. १९९९ सालापासून युनेस्को या जागतिक संस्थेनं २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं. त्यानुसार विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा मायबोली मराठी सप्ताह म्हणून साजरा केला जातो.


मराठी भाषेचा इतिहास

मराठी भाषेची मुहूर्तमेढ रोवली ती शिवाजी महाराजांनी आणि पेशव्यांनी. मराठी भाषेची महती दुर्गा भागवतांचे आजोबा राजारामशास्त्री भागवत यांनी १८८५ सालीतर ज्ञानकोषकार श्री. व्यं. केतकर यांनी १९२७ साली त्यांच्या ग्रंथातून लिहून ठेवली आहे. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशानं मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. तर १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली.


अभिजात दर्जा कधी ?

आतापर्यंत केंद्रानं तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांना अभिजात दर्जा दिलाय. मराठी भाषेलाही अभिजात दर्जा मिळवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्र सरकारकडे अहवाल देखील पाठवण्यात आला आहे. मराठीचं वय ८०० वर्षं नमूद केल्यानं त्याला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अडथळे येत होते. मराठी ही संस्कृतपासून जन्माला आली हा देखील एक गैरसमज अहवालाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. त्यामुळं आता आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या केवळ एक पाऊल दूर आहोत.


दर्जा देण्याचे निकष

  • भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असणं आवश्यक
  • भाषेचं वय दीड ते अडीच वर्ष असावं
  • भाषेला स्वत:चं स्वयंभूषण असावं
  • प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
संबंधित विषय
ताज्या बातम्या