Advertisement

मुंबईत ट्रॅफिक सिग्नलवर फुलं विकणाऱ्या मुलीची कमाल, पीएचडीसाठी पोहोचली अमेरिकेत

वडिलांसोबत मुंबईतल्या रस्त्यांवर फुलांचे हार विकण्याचे काम करणाऱ्या २८ वर्षीय महिलेला कॅलिफोर्निया विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळाला आहे.

मुंबईत ट्रॅफिक सिग्नलवर फुलं विकणाऱ्या मुलीची कमाल, पीएचडीसाठी पोहोचली अमेरिकेत
SHARES

इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो. याचेच उदाहरण मुंबईतल्या एका तरुणीनं दिलं आहे. वडिलांसोबत मुंबईतल्या रस्त्यांवर फुलांचे हार विकण्याचे काम करणाऱ्या २८ वर्षीय महिलेला कॅलिफोर्निया विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळाला आहे.

सरिता माळी (Sarita Mali) या तरुणीनं खडतर परिस्थितीवर मात करत आपल्या स्वप्नांना गवसणी घातली आहे. मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवर फुल विकण्यापासून ते अमेरिकेची फेलोशिप मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास प्रेरणादायी आहे.

२८ वर्षांची सरिता जेएनयू रिसर्च स्कॉलर अमेरिकामध्ये पीएचडीचा अभ्यास करत आहे. सरिता मुंबईतील घाटकोपर परिसरात लहानाची मोठी झाली. सरिताला लहानपणी वर्णभेदाचा सामना करावा लागला. मात्र, वडिलांचा खंबीर आधारामुळं सरिता डगमगली नाही. शिक्षणानंतर उच्चवर्गीय आपल्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगू शकतात हे सरिताच्या वडिलांनी गावाकडे बघितलं होतं. म्हणूनच त्यांनी सरिताला शिकवण्याचा निर्णय घेतला.

दहावीनंतर सरिताने घरातच ट्युशन घेण्यास सुरुवात केली. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती मेहनत घेत होती. ट्युशनमधून येणारे पैसे साठवून तिने के.जे सोमय्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. सरिताचा संघर्ष पाहून तिची मोठी बहिण व दोन भावांनीही शिक्षणाला प्राधान्य दिलं.

2010 मध्ये तिच्या एका चुलत बहिणीने तिला JNU बद्दल सांगितले आणि अनेक गोष्टी तिला माहीत नव्हत्या. 2010 मध्ये, इंटरनेटचे युग नव्हते आणि पदवीपर्यंत तिच्याकडे स्मार्टफोनही नव्हता. तर अचानक ते म्हणाले, 'जो जेएनयूमध्ये जातो तो काहीतरी बनतो'. ती खास ओळ तिच्या मनात कुठेतरी अडकली.

ती रोज एखाद्या मंत्राप्रमाणे जपत असे. तिने बीएच्या पहिल्या वर्षात जेएनयूची तयारी सुरू केली. त्या वेळी, जेएनयूच्या परीक्षा व्यक्तिनिष्ठ असायच्या आणि 2014 मध्ये, तिची जेएनयूमधील ओबीसीच्या शेवटच्या जागेसाठी तिच्या मास्टर्ससाठी निवड झाली, ती म्हणाली.

सरिताने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपला अनुभव सांगितला आहे. अमेरिकेतील दोन महाविद्यालयात माझी निवड झाली आहे. कॅलिफॉर्निया आणि वॉशिंगटन विद्यापिठाने मला फेलोशिपसाठी निवड करण्यात आली होती. यात मी कॅलिफॉर्निया विद्यापिठ निवडले असून त्यांनी माझ्या मेरिट व शैक्षणिक पात्रता पाहून अमेरिकेची प्रतिष्ठित फेलोशिपमधील एक चान्सलर फेलोशिप दिली आहे.

शिक्षणामध्ये परिस्थी बदलण्याची ताकद आहे, हे तिच्या लक्षात आले. २०१४मध्ये तिने दिल्लीतील जे.एन.यु विद्यापिठात हिंदी साहित्यात मास्टर्स करण्यासाठी प्रवेश घेतला.

जे.एन.युत मास्टर्स करण्यासाठी आलेल्या सरिताने एम.ए, ए.फिलसोबतच पी.एच.डी पूर्ण केली. त्यानंतर तिला पुन्हा एकदा अमेरिकेत पी.एचडी करण्याची संधी मिळाली. तसंच, अमेरिकेत तिला शिकवण्याची संधी मिळाली आहे.

सरिता माळी यांच्या कुटुंबात आई, वडील, मोठी बहीण आणि दोन लहान भाऊ असे एकूण 6 सदस्य आहेत. फक्त कमावणारे तिचे वडील आहेत. लॉकडाऊनमुळे तिचे वडील जौनपूरमधील बदलापूर येथील त्यांच्या गावी गेले.



हेही वाचा

अजान वाजणार नाही, पण काकड आरती थांबवू नका, शिर्डीतील मुस्लिम समुदायाची मागणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा