Advertisement

'या' आदिवासी भाषेला विकिपीडियावर पहिलं स्थान

भारतात प्रामुख्यानं बोलली जाणारी आदिवासी भाषा म्हणजे संथाली आता विकिपीडियाच्या मोजक्या भारतीय भाषांच्या यादीत समाविष्ट केली आहे.

'या' आदिवासी भाषेला विकिपीडियावर पहिलं स्थान
SHARES

भाषा कुठलीही असो पण ती प्रभावी असते. काही शब्द नव्यानं विशिष्ट भाषेमध्ये सामील होतात तर काही शब्द हे प्रचलनातून बाद होतात. मात्र, तरी तो त्या भाषेचा ठेवाच असतो. आता भाषेचं हेच महत्त्व विकिपिडियालादेखील समजलं आहे. भारतात प्रामुख्यानं बोलली जाणारी आदिवासी भाषा म्हणजे संथाली आता विकिपीडियाच्या मोजक्या भारतीय भाषांच्या यादीत समाविष्ट केली आहे. एखादी ठरावीक माहिती वाचण्यासाठी आपल्याला हवी ती भाषा निवडता येत होती. पण यामध्ये आजपर्यंत एकाही भारतीय आदिवासी भाषेचा समावेश नव्हता. पण आता ते शक्य आहे.


कुठली आहे संथाली भाषा?

संथाली भाषा भारतातील आदिवासी भाषा आहे. भारतात झारखंड, ओडिसा आणि पश्चिम बंगाल भागात ६४ लाख लोकांची संथाली ही प्रमुख भाषा आहे. याशिवाय नेपाळ आणि बांगलादेशातही ती बोलली जाते. २८ जुलै २०१८ ला विकिपीडिया फाऊंडेशनतर्फे संथाली भाषेला हिरवा कंदील मिळाला आणि २ ऑगस्टपासून ती विकिपीडियामध्ये सामील करण्यात आली. संथाली भाषेला जीवंत ठेवण्यासाठी आणि विकिपीडियावर आणण्यासाठी अनेकांनी मदत केली.


आदिवासी टिकवण्यासाठी प्रयत्न

संथालीच्या विकिपीडिया एडिशनमध्ये ७० हजार शब्दांची माहिती साठवण्यात आली आहे. ही माहिती ओलचीकी या लिपीत लिहिली गेली आहे. संथाली भाषा लिहिण्यासाठी ओलचीकी लिपी वापरण्याची पद्धत आहे. याच लिपीमध्ये उत्तर पूर्वेतील काही मोजक्या आदिवासी भाषा लिहिल्या जातात. आदिवासी परिषदेकडून संथालीच्या कार्यशाळा घेतल्या जात आहेत. संथाली भाषेतून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. 


संथालीतून १० वीची परीक्षा

याच प्रयत्नांमुळे यावर्षी पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये १०० विद्यार्थ्यांनी १० वीच्या बोर्डाची परीक्षा संथाली भाषेतून दिली. एवढंच नाही तर २०१७ साली शिखा मंडी ही पहिली संथाली भाषा बोलणारी रेडिओ जॉकी बनली आहे. विकिपीडियानं घेतलेल्या या निर्णयामुळे संथाली भाषा जिवंत ठेवण्यासाठी मदत होईल, अशी प्रतिक्रिया संथाली भाषिकांनी व्यक्त केली.



हेही वाचा

कॅफे चालवणारे 'स्पेशल १३'




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा