Advertisement

कॅफे चालवणारे 'स्पेशल १३'


कॅफे चालवणारे 'स्पेशल १३'
SHARES

रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि कॅफेमध्ये आपण सर्वच जात असतो. कुठली तरी संकल्पना घेऊन कुठे ना कुठे नवीन ठिकाण प्रसिद्धीस येत असते. त्याच्या वेगळेपणामुळे ते लोकप्रिय होते. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळताच चर्चा होते आणि गर्दी वाढते. अशाच एका कॅफेची आम्ही ओळख करून देणार आहोत. तुम्ही म्हणाल इतर रेस्टॉरंट आणि कॅफेप्रमाणे हा एक कॅफे आहे. मग यात खास असं काय? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल.



असं कसं खास नाही? या कॅफेची बातच काही और आहे. कारण हा कॅफे चालवणारे कर्मचारी डाऊन सिंड्रोम आणि ऑटिझम या आजारानं ग्रस्त आहेत. पण इच्छाशक्ती आणि हिंमत असेल तर सर्व शक्य आहे हे इथल्या कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलं आहे.


आजारावर केली मात

डाऊन सिंड्रोम असलेल्या आदितीला स्वयंपूर्ण करण्याच्या ध्यासातून तिच्या पालकांनी आदिती कॅफे काढला. आज हा कॅफे पूर्णपणे आदितीच सांभाळते. आदितीसारखाच आत्मविश्वास 'कॅफे अर्पण'च्या कर्मचाऱ्यांमध्ये जाणवतो. त्यांचा हाच वेगळेपणा कॅफे आदितीची स्पेशल असण्याची देखील जाणीव करून देतो. फिलीपाईन्स इथल्या पझल कॅफेवरून ही संकल्पना राबवण्यात आली.  



टिफिन सर्विस ते कॅफे अर्पण

डॉ. सुषमा नगरकर अमेरिकेहून आपल्या मुलीसोबत भारतात परत आल्या. डाऊन सिंड्रोम आणि ऑटिझम या आजारानं त्रस्त असलेल्यांसाठी काही तरी करावं ही त्यांची इच्छा होती. याशिवाय कुणाची दया आणि सहानभूती न घेता स्वत:च्या मुलीला देखील त्यांना सामान्य आयुष्य द्यायचं होतं. त्यादृष्टीनं विचार करता करता त्यांना टिफीन देण्याची कल्पना सुचली. यातूनच अर्पण डबा सेवा ही टिफीन सर्व्हीस सुरू झाली. दिवसाला जवळपास ५० डबे पाठवले जायचे. पुढे जाऊन त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. त्यांना मोठ्या जागेची आवश्यकता होती. मोठी जागा मिळताच त्यांनी कॅफे अर्पण सुरू केलं.


कॅफे अर्पणमधील हटके फूड

कॅफेमध्ये हेल्थ फूड, ज्यूस, स्मूदी, कॉफी, चहा, सँडविच असे अनेक पदार्थ सर्व्ह केले जातात. इथल्या पदार्थांना हटके नावं देखील देण्यात आली आहेत. विदेशी वडापाव, रस्तेवाला सँडविच, एअरपोर्टवाला स्पेशल सँडविच, कचूंबर सलाड, गरम चाय आणि आईस चाय ही इथल्या काही डिशेसची नावं आहेत. कॅफेमध्ये खास म्युझिकल ग्रुप देखील आहे. 'तरंग' असं या ग्रुपचं नाव आहे. तबला, सितार, बँजो वाजवणारे कलाकार इथं आपली कला सादर करतात. भरतनाट्यमचेही शो इथं होतात.



डाऊन सिंड्रोम आणि ऑटिझम या आजारानं त्रस्त असलेले कर्मचारी भाज्या धुणे, चिरणे, मसाले काढून देणे, तयारी करणे, ऑर्डर घेणे-देणे ही सर्व प्रकारची कामं करतात. या सर्वांना योग्य प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे आज ते पूर्ण कॅफे स्वत: सांभाळत आहेत.  




हेही वाचा

गंभीर आजारालाही तिनं हसून दिलं उत्तर! 




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा