Advertisement

कोरोना काळात बेरोजगारी वाढली, महाराष्ट्राला सर्वाधिक फटका

कोरोना काळात बेरोजगारीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रातील शहरी भागात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

कोरोना काळात बेरोजगारी वाढली,  महाराष्ट्राला सर्वाधिक फटका
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लाॅकडाऊनचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. सर्वच क्षेत्रांना लाॅकडाऊनची मोठी झळ बसली आहे. उद्योग, व्यवसाय कंपन्या बंद असल्याने देशातील कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. 

कोरोना काळात बेरोजगारीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रातील शहरी भागात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्यातील बेरोजगारीचा शहरी भागातील दर गेल्या वर्षी एप्रिल-जूनमध्ये ३५.६ टक्के तर जुलै-सप्टेंबर या काळात २२.६ टक्के होता. बेरोजगारीच्या अनुक्रमे २०.९ व १२.३ टक्के या सरासरी दरापेक्षा महाराष्ट्राच्या शहरी भागात बेरोजगारीचा दर अधिक होता.

जुलै ते सप्टेंबर २०२० या काळातील मनुष्यबळाच्या तिमाही अहवालातून बेरोजगारीची ही आकडेवारी समोर आली आहे.  या आकडेवारीनुसार, झारखंडमध्ये बेरोजगारीचा दर या दोन तिमाहीत ३२ टक्के व १९.८ टक्के होता. केरळात बेरोजगारीचा दर एप्रिल ते जून २०२० या काळात २७.३ टक्के होता तर जुलै ते सप्टेंबर २०२० या काळात तो १८.९ टक्के होता.

सर्वात जास्त बेरोजगारीचा दर महाराष्ट्रात आहे. त्यानंतर झारखंड, केरळ आणि जम्मू-काश्मीरचा क्रमांक लागतो.जम्मू-काश्मीरमध्ये जुलै ते सप्टेंबर २०२० या काळात बेरोजगारीचा दर १७.४ टक्के होता. त्यानंतर ओडिशा व तेलंगणात हा दर अनुक्रमे १६.५ टक्के व १५.४ टक्के होता.  दिल्लीत एप्रिल ते जून २०२० या काळात बेरोजगारीचा दर१०.५ टक्के आणि जुलै ते सप्टेंबर २०२० या काळात ४.५ टक्के होता. 

जुलै ते सप्टेंबर या काळात पुरुष व महिलांमध्ये बेरोजगारीचा दर आधीच्या तिमाहीच्या तुलनेत १२.६ व १५.८ टक्के राहिला आहे. आधीच्या तिमाहीत हा दर २०.८ टक्के व २१.२ टक्के होता. जुलै-सप्टेंबर २०१९ या काळात बेरोजगारीचा दर पुरुषांमध्ये ८ टक्के तर महिलांमध्ये ९.७ टक्के होता. 




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा