सावली फाऊंडेशनकडून नऊ महिलांचा गौरव


SHARE

मुंबई - नवरात्रीच्या दिवसांत भक्त देवीच्या विविध नऊ रूपांना साद घालतात. सावली फाऊंडेशन मात्र या महिलांमधील खऱ्याखुऱ्या देवींना नवशक्ती- नवचेतना पुरस्काराने गौरविणार आहे.

समाजातील विविध क्षेत्रातील नऊ महिलांना ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सावली फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी दिली. शनिवारी भांडुपमधील तुळशेत पाडा येथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे.

नवशक्ती- नवचेतना पुरस्कारप्राप्त मानकरी
किरण कुमारी चुटकी सिंग - वेश्यावृत्तीविरुद्ध झुंज
सुप्रिया जोशी - स्त्री शिक्षणसाठी जागरुक आई 
अश्विनी कराडे - संस्थापक, उमंग ट्रस्ट
आरती कांबळे - उद्योजिका
प्रणाली निमकर-देसाई - युट्यूब फोक टॉकीजच्या संस्थापक
सुजाता पाटील - पोलीस कर्मचारी
मनिषा म्हात्रे - क्राईम रिपोर्टर
सिद्धी घाडगे - राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी खेळाडू
सारा श्रवण- अभिनेत्री

संबंधित विषय
ताज्या बातम्या