निव्वळ अफलातून! बघाल तर थक्क व्हाल!

wadala, Mumbai  -  

वडाळा - खडकाळ रोड, वेड्यावाकड्या वाटा आणि त्यात बाईक चालवणारा हा डेअरिंगबाज. या डर्ट बाईकमध्ये थ्रिलिंग दाखवणारा डेअरिंगबाज हे सहज करतो. युवराज कोंडे देशमुख असे या छोट्या उस्तादाचे नाव असून तो केवळ 12 वर्षांचा आहे.

मलेशियात होणाऱ्या एफआयएम मोटोक्रॉस ज्युनिअर चम्पियनशीपमध्ये युवराज भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मलेशियात 24 आणि 25 मार्चला ही स्पर्धा होणार आहे.

आठ वेळा नॅशनल चम्पियनशीप ठरलेले रुस्तम पटेल हे त्याचे प्रशिक्षक आहेत. तसेच युवराजच्या वडिलांना त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. युवराजने दुबई चम्पियनशीपवर स्वत:चे नाव कोरले आहे. 

आता 12 वर्षीय युवराज मलेशिया चम्पियनशीपवर आपली छाप कशी पाडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading Comments