Advertisement

नेव्ही मॅरेथाॅनमध्ये ध्यानेश्वर, लिलमा अव्वल


नेव्ही मॅरेथाॅनमध्ये ध्यानेश्वर, लिलमा अव्वल
SHARES

मुंबईत थंडीला नुकतीच सुरूवात झाल्याने बहुतांश मुंबईकर चादर अंगावर ओढून गाढ झोपलेले असताना बीकेसीत निरोगी राहण्याचा सल्ला देण्यासाठी हौशी अबालवृद्ध रविवारी पहाटे रेसिंग ट्रॅकमध्ये उतरले होते. निमित्त होतं नेव्ही दिनाचं.



१४ हजारांहून अधिक जणांचा सहभाग

साई इस्टेट आयोजित हाफ मॅरेथाॅन स्पर्धेत धावून या अबालवृद्धांनी मुंबईकरांना निरोगी आरोग्य, राष्ट्रवाद आणि देशभक्तीचा संदेश दिला. या स्पर्धेत प्रोफेशनल स्पर्धकांसोबत नेव्हीचे अधिकारी, त्यांचं कुटुंबीय देखील सहभागी झालं होतं. एकूण १४ हजारांपेक्षा अधिक जणांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजेत्यांना लाकडी जहाजाची प्रतिकृती पारितोषिक म्हणून देण्यात आली.



'हे' आहेत विजेते

या हाफ मॅरेथाॅनमध्ये ५ किमी, १० किमी आणि २१ किमी असे एकूण तीन प्रकार होते. प्रत्येक प्रकारांत पुरूष आणि महिला असे दोन गट होते. त्यानुसार २१ किमी या मुख्य प्रकारात पुरूष गटात ध्यानेश्वर मोरगव तर महिला गटात लिलमा अल्फान्सो यांनी पहिला क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अनुक्रमे मनोहर तांबे आणि क्रांती साळवी तसेच तृतीय क्रमांक विद्यानंद यादव आणि पायल यांनी मिळवला.


२१ किमी (खुला गट):

पुरुष
महिला
१) ध्यानेश्वर मोरगव
लिलमा अल्फान्सो
२) मनोहर तांबेक्रांती साळवी
३) विद्यानंद यादवपायल खन्ना


२१ किमी (व्हेटरन):

पुरुष
महिला
१) पांडुरंग पाटील
प्रीती लाला
२) सम्राट गुप्ता
ब्रेनरली मॅथ्यू
३) पियुष दास
मोनिका पटेल


१० किमी

१) दिनेश मौर्या
१) कविता भोईर
२) देवींदर सिंग
२) श्वेता गावडे
३) करणदीप सिंग
३) राशी कदम


१० किमी मुले (१७ वर्षे)
मुली
१) शुभम अहिरे
१) मधुरा गीजरे


५ किमी मुले

१) गणेश पारेख
१) स्वाती पांडे


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा