• कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेत गोरेगाव संघ भक्कम स्थितीत
SHARE

माटुंग्यातील डीपीझेड मैदानात 27 व्या कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेअंतर्गत मंगळवारी वांद्रे आणि गोरेगाव संघात सुरू असलेल्या सामन्यात गोरेगावने भक्कम आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वांद्रे संघाचा संपूर्ण संघ 126 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या गोरेगाव संघाने 58.4 षटकांत सर्वबाद 215 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्येही वांद्रे संघाची दिवसअखेर 106 धावांवर घसरगुंडी उडाली. गोरेगावच्या अमन मनिहार याने 7 गडी बाद करून वांद्रे संघाला खिंडार पाडले.

यंदाच्या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झालेले असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. 6 मे रोजी झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी क्रिकेटपटू साईराज बहुतुले आणि सुरेंद्र भावे उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या