सचिन तेंडुलकरसाठी काढली ४४ फुटांची रांगोळी!

क्रिकेट जगतात देव म्हणून ओळखला जाणारा आणि मुंबईकरांचा लाडका सचिन तेंडुलकर याचा सोमवारी 44 वा वाढदिवस. त्या निमित्ताने भारतातील सर्व क्रिकेट चाहते त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. परळ येथे राहणाऱ्या एका सचिनच्या चाहत्याने 44 फूट लांबी आणि 24 फूट रुंदी असलेली रांगोळी काढून सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेक साटम याने रांगोळीतून सचिनच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांना अधोरेखित केले आहे. या रांगोळीत बालपणापासूनचे त्याचे चित्र देखील रेखाटले आहे. त्याने सचिनची स्वाक्षरी देखील या रांगोळीतून रेखाटली आहे. सचिनचा हा 44 वा वाढदिवस म्हणून 44 फूट लांब आणि क्रिकेटच्या कारकिर्दीत सचिनने 24 वर्षे समर्पित केली म्हणून 24 फूट रुंद अशी ही रांगोळी त्याने काढली आहे. या रांगोळीसाठी अभिषेकला तब्बल 20 तास लागले.

सचिनच्या या चाहत्याचे आणखी एक वैशिष्ट्य असे की गेल्या 17 वर्षांपासून वर्तमानपत्रात येणारे सचिन विषयीचे लेख त्याने आत्तापर्यंत जमा केले आहेत. तसेच 40 पुस्तकं आणि 160 मॅगझिनचा संग्रह त्याने जमा केला आहे.

Loading Comments