मुंबईकर आयुशीची गोल्डन किक

Dahisar
मुंबईकर आयुशीची गोल्डन किक
मुंबईकर आयुशीची गोल्डन किक
See all
मुंबई  -  

दहिसरमध्ये राहणाऱ्या आयुशी यादवने पुणे येथे झालेल्या किक बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून लक्षवेधी कामगिरी केली आहे. 'अॅमेच्युर स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन'ने ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल येथे आयोजित केली होती.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण १२ जिल्ह्यातील १२०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. तर मुंबईचे ११ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. आयुशीने ४० किलो वजनी गटात हे सुवर्णपदक मिळवले आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या एकूण ९ खेळाडूंमध्ये आयुशी ही एकटीच मुलगी होती.

मुलांच्या खांद्याला खांदा लावत तिने हे यश मिळवलेले आहे. हे सर्व खेळाडू १६ ते २० वर्षे वयोगटातील आहेत. या स्पर्धेत मुंबईकर खेळाडूंनी आपला दबदबा राखून सुवर्णपदक, रौप्यपदक आणि कांस्यपदकाची कमाई केली.


मी सध्या ठाकूर महाविद्यालयात एसवायबीकॉमचे शिक्षण घेत आहे. याआधी किक बॉक्सिंग, वुशू चायनीज मार्शल आर्ट आणि चेस बॉक्सिंगमध्ये मी राष्ट्रीय पातळीवर विजेपद मिळवलेले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सलग राज्यस्तरीय किक बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धा जिंकण्याची हॅट्रिकही मी केली आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याचाही खूप आनंद आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची माझा मानस आहे.
- आयुशी यादव, किक बॉक्सिंग खेळाडू


स्पर्धेत मुंबईकर खेळाडूंचा दबदबा

किक बॉक्सिंग चॅम्पियनशीप २०१७ मध्ये मुंबईच्या इतर खेळाडूंनी देखील चमकदार कामगिरी केली. अजित जयस्वाल याने ६० किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. तर कुशग्रा गुप्ता आणि अभय कहर यांनी अनुक्रमे ८० किलो तसेच ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली.

इतर सामन्यात मुंबईच्या सत्यम पांडे, तुशार शर्मा आणि हितेश सोलंकी यांनी अनुक्रमे ६० किलो, ५० किलो आणि ७० किलो वजनी गटात रौप्यपदकावर आपले नाव कोरले. तर रोहित राजभर आणि उमेश जयस्वाल यांनी ६५ तसेच ४५ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई करून चमकदार कामगिरी केली. हे सर्व खेळाडू सांताक्रूझ येथील कॉमबॅट अकादमीतील आहेत.
आमच्या अकादमीतील ११ पैकी ९ खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली आहे. यासाठी या खेळाडूंनी खूपच मेहनत घेतली होती, खडतर सराव केला होता. खेळाडूंचे हे यश पाहून खूपच समाधान मिळाले आहे. यानंतर ६ सप्टेंबरला छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आम्ही तयारी करणार आहोत. या स्पर्धेतही आम्ही चांगले यश मिळवू.
- नितेश यादव, प्रशिक्षक, किक बॉक्सिंगहे देखील वाचा -

मुंबईकर रुचीच्या हाती भारतीय रग्बी संघाची धुराडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.