Advertisement

स्वच्छ धारावी, स्वस्थ धारावी मॅरेथॉन


स्वच्छ धारावी, स्वस्थ धारावी मॅरेथॉन
SHARES

धारावी - मुंबईत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू पाहणाऱ्या धारावीत रविवारी एएफसी जिमतर्फे धारावी मॅराथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. मॅरेथॉनमध्ये लाखो रुपयाची रोख बक्षीसं असल्यानं ५००हून अधिक धावपट्टूनी या स्पर्धेत भाग घेतला होता. सकाळी ९ वाजता जेष्ठ समाजसेवक भाऊ कोरडे आणि लष्करातील सेवानिवृत्त कॅप्टन शिवाजीराव महाडकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून धारावी मॅराथॉनला सुरुवात झाली. स्वच्छ धारावी, आरोग्यदायी धारावी हा सामाजिक संदेश घेऊन यंदा प्रथमच धारावी धावली.

पहिल्या धारावी मॅरेथॉनमध्ये महिलांमध्ये जोया शेख नावाच्या मुलीनं प्रथम क्रमांक पटकावला. धारावीतल्या मोहमद इसाक यानं प्रथम क्रमांक पटकावला. तर मनीष कुमारनं दुसरं स्थान पटकावलं. अरुण नाडार याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अंजर खान चौथा तर जस्टिन नाडर याला पाचवं स्थान मिळालं.

संबंधित विषय
Advertisement