अंडर - 14 क्रिकेट टूर्नामेंटमध्ये अल बरकत संघ विजयी

 BKC
अंडर - 14 क्रिकेट टूर्नामेंटमध्ये अल बरकत संघ विजयी

वांद्रे - अंडर - 14 जाईल्स शिल्ड क्रिकेट टूर्नामेंटमध्ये कुर्लाच्या अल-बरकत संघाने आयइएस वीएन सुळे संघाला हरवून सामना जिंकला. अल बरकत संघाने आयइएस वीएन सुळे या संघाला एक डाव आणि 121 धावांनी मात दिली. आयइएस वीएन सुळे संघाने दोन्ही दिवसांच्या खेळात 86 आणि 69 धावा केल्या. त्यामुळे अल बरकत संघाला दुसऱ्या दिवसाच्या सामन्यात फार काळ मैदानात थांबायची गरजच भासली नाही.

मध्यमगती गोलंदाज अनस मलिकने पहिल्या डावात 7 गडी बाद केले. त्यानंतर लेग स्पिनर अनुराग सिंगने चांगली खेळी करुन अल बरकत संघाला विजय मिळवून दिला. या मॅचसाठी क्रिकेटर पारस म्हांब्रे, एमसीएचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे, क्रिकेट आणि एमसीए व्यवस्थापकीय समिती सदस्य सचिव नदीम मेमन आणि माजी क्रिकेटपटू इकबाल शेख उपस्थित होते.

Loading Comments