Advertisement

सेंट्रल बँकेला सेकंड डिव्हिजनचे विजेतेपद


सेंट्रल बँकेला सेकंड डिव्हिजनचे विजेतेपद
SHARES

अंकित गौड याने झळकावलेल्या पाच गोलमुळे सेंट्रल बँक अाॅफ इंडियाने किल्लेदार इलेव्हनचा ७-४ असा पाडाव करत एमएचएएल लीग २०१८-१९ च्या सेकंड डिव्हिजनचे विजेतेपद पटकावले. चर्चगेट येथील एमएचएएल- महिंद्रा स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात, अंकित गौड याने अाक्रमणाची धुरा अापल्याकडे घेत पात गोल लगावले, त्याला सतराज अालम याचीही चांगली साथ लाभल्यामुळे सेंट्रल बँकेला मोठ्या दिमाखात या स्पर्धेचे जेतपद पटकावता अाले.


किल्लेदारची कडवी लढत

एकीकडून सेंट्रल बँकेचे जोरदार हल्ले सुरू असताना किल्लेदार इलेव्हननेही त्यांना तितकीच तोलामोलाची कडवी लढत दिली. मात्र सेंट्रल बँकेच्या वेगवान खेळासमोर त्यांचा निभाव लागला नाही. शाहबाज शेख, दिग्विजय कळसे, स्वप्निल पाटील अाणि अामीर खान यांनी प्रत्येकी एक गोल करत प्रतिस्पर्ध्यांना सोपा विजय मिळवू दिला नाही.


अंकितचे चार मैदानी गोल

नवव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी काॅर्नरवर अंकितने पहिला गोल लगावला. मात्र त्यानंतर सुरेख कामगिरी करत त्याने अापल्यातील अप्रतिम हाॅकीचे कौशल्य दाखवत चार मैदानी गोल झळकावले. विशेष म्हणजे, पेनल्टी काॅर्नरवर झालेला पहिला गोल वगळता सामन्यातील अन्य १० गोल हे मैदानी गोल होते. एमएचएएलचे अध्यक्ष मंघासिंग बक्षी यांच्या हस्ते विजेत्यांना चषक अाणि २५ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात अाले.


हेही वाचा -

माजी क्रिकेटपटूंनाही मिळणार एमसीएत मतदानाचा हक्क

रवी शास्त्रींच्या अायुष्यात अाली 'ही’ अभिनेत्री?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा