Advertisement

मुंबई स्नूकर लीगमध्ये आर्क चिताज, ऑटर्स रॉकेट्स उपांत्य फेरीत


मुंबई स्नूकर लीगमध्ये आर्क चिताज, ऑटर्स रॉकेट्स उपांत्य फेरीत
SHARES

अंधेरी रिक्रेएशन क्लबच्या आर्क चिताज संघाने आणि ऑटर्स क्लबच्या ऑटर्स रॉकेट्स संघाने आपापल्या लढती ३-२ अशा फरकाने जिंकत ऑटर्स क्लब अायोजित बीएसएएम मुंबई स्नूकर लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ऑटर्स क्लब बिलियर्डस रूममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आर्क चिताज संघाने रेडिओ क्लबच्या रेडिओ फ्युजन संघाला चुरशीच्या लढतीत नमविले. गतविजेत्या ऑटर्स क्लब रॉकेट्स संघाने बॉम्बे जिमखान्याच्या बीजी फँटम्स संघावर विजय नोंदवला.


अार्क चिताजची दमदार अाघाडी

अंधेरी संघाने चांगली सुरुवात करत २-० अशी आघाडी घेतली होती. पहिल्या फ्रेममध्ये त्यांच्या तरुण कालरा आणि अक्षय वसानी जोडीने रेडिओ क्लबच्या अनुज महाजन आणि नेविल राझमी जोडीला ७२-४९ असे नमविले. नंतर आर्कचा कर्णधार करण आनंदने रयान राझमी
याच्यावर ८४-८० असा विजय मिळवला.


रेडियो क्लबचे चोख प्रत्युत्तर

रेडिओ क्लबच्या १३ वर्षीय शाहयान राझमीने ओम सावंतवर तिसऱ्या फ्रेममध्ये १०८-५५ असा विजय मिळवत पिछाडी भरून काढली. चौथ्या फ्रेममध्ये रयान याने करण आनंद याच्यावर ८३-७० असा विजय नोंदवत सामना २-२ असा बरोबरीत आणला. पाचव्या व निर्णायक फ्रेममध्ये अक्षय वसानीने शाहयानचा ९३-६२ असा पराभव करत चिताजचे पुढच्या फेरीतील स्थान निश्चित केले.


हेही वाचा -

मुंबई स्नूकर लीगमध्ये अव्वल खेळाडूंचा जलवा

चार वर्षांनंतर कमबॅक करणे मुश्किल – सुशीलकुमार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा