Advertisement

चार वर्षांनंतर कमबॅक करणे मुश्किल – सुशीलकुमार

कोणत्याही कुस्तीपटूसाठी तब्बल चार वर्षांनंतर कमबॅक करणं सोपं नसतं. कोणत्या क्षणी ताकद लावायची अाणि कोणत्या वेळी अचूक टायमिंग साधत प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवायचं, यासाठी सराव अावश्यक असतो. चार वर्षांनंतर जोमाने कमबॅक करण्यासाठी सज्ज अाहे, असं कुस्तीपटू सुशीलकुमार यानं सांगितलं.

चार वर्षांनंतर कमबॅक करणे मुश्किल – सुशीलकुमार
SHARES

दुखापतीमुळे रिअो अाॅलिम्पिक, गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेला मुकावे लागलेला मल्ल सुशीलकुमार अाता अाशियाई स्पर्धेसाठी सज्ज होत अाहे. अाॅलिम्पिकमध्ये एक रौप्य अाणि एक कांस्यपदक पटकावणारा सुशीलकुमार अाता जाॅर्जिया येथे जाऊन जय्यत तयारी करणार अाहे. कोणत्याही कुस्तीपटूसाठी तब्बल चार वर्षांनंतर कमबॅक करणं सोपं नसतं. कुस्ती हा शारीरिक खेळ असल्यामुळे कोणत्या क्षणी ताकद लावायची अाणि कोणत्या वेळी अचूक टायमिंग साधत प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवायचं, यासाठी सराव अावश्यक असतो. पण गेले काही दिवस मी पूर्ण तयारीत असून चार वर्षांनंतर जोमाने कमबॅक करण्यासाठी सज्ज अाहे, असं सुशीलकुमार यानं सांगितलं. भारतीय कुस्ती महासंघाला टाटा मोटर्सचं प्रायोजकत्व लाभलं असून त्यानिमित्तानं मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सुशीलकुमारनं अापल्या पुढील वाटचालीविषयी मुंबई लाइव्हशी गप्पा मारल्या.


अाशियाई स्पर्धेत सुवर्णपदकच मिळवेन

अाॅलिम्पिकमध्ये दोन, राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण, जागतिक स्पर्धांमध्ये सुवर्ण अशी मी कामगिरी केली अाहे. पण अाशियाई स्पर्धेत मला एकही पदक मिळवता अाले नाही. पण यंदा जकार्ता इथं होणाऱ्या अाशियाई स्पर्धेत मी सुवर्णपदकच पटकावण्याचा निर्धार बाळगला अाहे. त्यासाठी जबरदस्त तपश्चर्या सुरू अाहे, असंही सुशीलकुमारनं सांगितलं.


साक्षी मलिकला पदकाचा विश्वास

रिअो अाॅलिम्पिकमध्ये महिलांच्या ५८ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावणाऱ्या साक्षी मलिकला अाशियाई स्पर्धेत पदकाचा विश्वास वाटत अाहे. “माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मी प्रयत्न करणार अाहे. जपान अाणि चीनच्या प्रतिस्पर्ध्यांकडून मला कडवी लढत अपेक्षित अाहे. मात्र समोर कोणताही प्रतिस्पर्धी असो, त्याचा विचार न करता मी माझे डावपेच अाखत असते. प्रत्येक प्रतिस्पर्ध्यासाठी मी वेगळी रणनीती अाखली अाहे,” असे साक्षी मलिक म्हणाली.


हेही वाचा -

सर्फराझ खानला करायचीय मुंबई संघात घरवापसी

२०१९ वर्ल्डकपनंतर डेल स्टेनची वनडेतून निवृत्ती!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा