Advertisement

२०१९ वर्ल्डकपनंतर डेल स्टेनची वनडेतून निवृत्ती!


२०१९ वर्ल्डकपनंतर डेल स्टेनची वनडेतून निवृत्ती!
SHARES

सततच्या दुखापतींना कंटाळून दक्षिण अाफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०१९ वर्ल्डकपनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून म्हणजेच वनडे अाणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला अाहे. सध्याच्या घडीचा जगातील सर्वात धोकादायक गोलंदाज अशी अोळख असलेल्या डेल स्टेनला वर्ल्डकपसाठी संघात स्थान मिळेल, अशी अाशा अाहे. मुंबईत झालेल्या एका व्यावसायिक कार्यक्रमात डेल स्टेननं ही महत्त्वपूर्ण घोषणा केली अाहे.


तेव्हा मी ४० वर्षांचा होईन

इंग्लंडमध्ये होणारा वर्ल्डकप दक्षिण अाफ्रिकेला जिंकून देण्याचा मी प्रयत्न करणार अाहे. मात्र वर्ल्डकपनंतर मी पांढऱ्या चेंडूने क्रिकेट खेळणार नाही. त्यानंतरचा वर्ल्डकप येईल, त्यावेळी मी ४० वर्षांचा असेन.


मला नक्कीच स्थान मिळेल

दक्षिण अाफ्रिका संघाच्या सध्याच्या फलंदाजीवर नजर टाकल्यास, अव्वल सहा जणांनी १००० पेक्षा जास्त सामने खेळले अाहेत. मात्र तळाच्या खेळाडूंचा अनुभव फारच कमी अाहे. त्यामुळे संघात अनुभवी गोलंदाजांची अावश्यकता अाहे. त्यामुळे मला वर्ल्डकपसाठीच्या दक्षिण अाफ्रिका संघात नक्कीच स्थान मिळेल, अशी अाशा डेल स्टेनने व्यक्त केली.


यापुढेही कसोटी क्रिकेट खेळणार

२०१९ वर्ल्डकपनंतरही मी कसोटी क्रिकेट खेळणे सुरूच ठेवणार अाहे. शक्य होईल तितका काळ मी कसोटी क्रिकेट खेळणार अाहे. गेल्या काही वर्षात अनेक दुखापतींना सामोरे जावे लागले. त्या दुखापतीतून पुनरागमन करणे कठीण होते. पण १०० टक्के फिट असल्याचा अानंद असून पूर्वीच्याच जोमात गोलंदाजी करणार अाहे, असे स्टेनने सांगितले.


हेही वाचा -

मुंबईत जन्मलेला अजाझ पटेल न्यूझीलंडच्या कसोटी संघात

'अन् विराट कोहलीनं मला ब्लॅकबेरी फोन गिफ्ट दिला'



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा