Advertisement

मुंबईत जन्मलेला अजाझ पटेल न्यूझीलंडच्या कसोटी संघात


मुंबईत जन्मलेला अजाझ पटेल न्यूझीलंडच्या कसोटी संघात
SHARES

मुंबई क्रिकेटची किर्ती सातासमुद्रापार पोहोचली अाहे. अजाझ पटेल हे त्याचं ताजं उदाहरण. मुंबईत जन्मलेला अजाझ पटेल याची न्यूझीलंड संघात निवड झाली अाहे. न्यूझीलंड संघ अाॅक्टोबर महिन्यात पाकिस्तानविरुद्ध संयुक्त अरब अमिराती येथे तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार अाहे, त्यासाठी फिरकी गोलंदाज अजाझ पटेलला स्थान मिळालं अाहे.


पटेलचं मुंबई कनेक्शन

बोटांद्वारे चेंडू स्पिन करणाऱ्या अजाझ पटेलचा २१ अाॅक्टोबर १९८८ रोजी मुंबईत जन्म झाला होता. पण लहान वयातच तो कुटुंबासह न्यूझीलंडला रवाना झाला. तेव्हापासून न्यूझीलंडमध्ये वास्तव्यास असलेला अजाझ हा सेंट्रल स्टॅग्स संघाचे प्रतिनिधित्व करत अाहे. न्यूझीलंडच्या डोमेस्टिक प्लंकेट शील्ड स्पर्धेत गेल्या तीन वर्षांपासून सर्वाधिक विकेट मिळवणारा तो एकमेव गोलंदाज ठरला अाहे.


अजाझची निवड का?

यूएईमधील फिरकीला पोषक असलेल्या वातावरणात फिरकीपटूच न्यूझीलंडला चांगलं यश मिळवून देतील, असा विश्वास मुख्य निवडकर्ते गेविन लार्सन यांना वाटत अाहे. त्यामुळेच दुखापतग्रस्त असलेल्या मिचेल सांतनेरच्या जागी अजाझ पटेलला संधी मिळाली अाहे. अजाझसह मनगटाद्वारे चेंडू स्पिन करणारे टाॅड अॅस्टल अाणि इश सोधी हे दोन फिरकीपटूही संघात अाहेत.


हेही वाचा -

'अन् विराट कोहलीनं मला ब्लॅकबेरी फोन गिफ्ट दिला'

सचिन तेंडुलकरची नवी इनिंग, करणार कोचिंग!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा