Advertisement

अार्यन-अर्जुन जोडीनं पटकावलं दुसरं अायटीएफ जेतेपद


अार्यन-अर्जुन जोडीनं पटकावलं दुसरं अायटीएफ जेतेपद
SHARES

मुंबईचा अार्यन गोवियस अाणि पुण्याचा अर्जुन काढे यांनी शनिवारी कायरो इथं झालेल्या इजिप्त फ्युचर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युक्रेनचा अलेक्झांडर बेलिन्स्की अाणि रशियाचा रोनाल्ड स्लोबोचिकोव्ह यांचा पाडाव करत सलग दुसऱ्या अाठवड्यात दुसऱ्या अायटीएफ जेतेपदाला गवसणी घातली.

अार्यन-अर्जुन जोडीनं गेल्या अाठवड्यात अापल्या कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या अायटीएफ जेतेपदावर मोहोर उमटवली होती. तोच फाॅर्म कायम राखत त्यांनी सलग दुसरं जेतेपद पटकावलं.


रंगतदार सामन्यात केली मात

उपांत्य फेरीत अव्वल मानांकित जोडीला पराभूत करणाऱ्या अलेक्झांडर-रोनाल्ड यांना अार्यन-अर्जुन यांनी  ६-७ (१), ६-१, १०-७ असे हरवले. टायब्रेकरपर्यंत रंगलेल्या पहिल्या सेटमध्ये भारताच्या या जोडीला पराभव पत्करावा लागला. मात्र दुसरा सेट सहज जिंकत त्यांनी सामन्यात रंगत निर्माण केली. सुपर टायब्रेकपर्यंत रंगलेल्या तिसऱ्या सेटमध्ये अार्यन-अर्जुन जोडीने ४-२ अशी अाघाडी घेतली, त्यानंतर ती ७-२ अशी वाढवली. प्रतिस्पर्ध्यांनी ८-७ अशी पिछाडी भरून काढल्यानंतर अार्यन-अर्जुन यांनी १०-७ अशा फरकानं तिसरा सेट जिंकत जेतेपदावर नाव कोरलं.


संबंधित विषय
Advertisement