Advertisement

अरिना सबालेंकाला मुंबई ओपन एकेरीचे जेतेपद


अरिना सबालेंकाला मुंबई ओपन एकेरीचे जेतेपद
SHARES

एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५ के सिरीज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित बेलारुसच्या आरिना सबालेंकाने स्लोव्हेनियाच्या डालिला जाकुपोविकला सरळ सेटमध्ये नमवत पहिले डब्ल्यूटीए जेतेपद मिळवले. तिने डालिला जाकुपोविकला ६-२, ६-३ ने मात देत जेतेपदाला गवासणी घातली. ही स्पर्धा चर्चगेटच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील सेंटर कोर्टवर खेळवण्यात आली. तीआनजीन ओपन स्पर्धेत सबालेंकाने पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. पण, तिला मारिया शारापोव्हाकडून पराभूत व्हावे लागले. सबालेंकाने १६० डब्ल्यूटीए गुणांची कमाई केल्याबद्दल २० हजार अमेरिकन डॉलर देऊन तिचा सत्कार करण्यात आला.


पहिल्या सेटमध्ये सबालेंकाचा विजया

सुरुवातीला संथ गतीने खेळत असलेल्या सबालेंकाने पहिल्या सर्व्हिसला थोडी अडखळली. पण नंतर आपल्या आक्रमक खेळाने प्रतिस्पर्धी खेळाडूवर दबाव आणला. जागतिक क्रमवारीत ९६ व्या स्थानावर असलेल्या सबालेंकाला २६ वर्षीय स्लोव्हेनियाच्या खेळाडूने काही चुका केल्या आणि त्याचा फायदा सबालेंकाला मिळाला. तीने अवघ्या आठ मिनिटांत ३-० ने आघाडी घेतली. जागतिक क्रमवारीत २५२ व्या स्थानावर असलेल्या जाकुपोविकने आठव्या गेममध्ये चमक दाखवली. पण, ती पुरेशी नव्हती आणि अवघ्या ३१ मिनिटांतच पहिला सेट सबालेंकाने ६-२ असा विजय मिळवला.सेट ६-३ ने जिंकला

दलीला जाकुपोविकने दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला चमक दाखवली आणि दुसऱ्या गेमनंतर तिने २-० अशी आघाडी घेतली. बेलारुसच्या खेळाडूने नंतर पुनरागमन करत सामन्यात ४-३ अशी आघाडी घेतली. आठव्या गेमनंतर सबालेंकाने ५-३ अशी आघाडी मिळवली. जाकुपोविकने ब्रेक पॉईंट मिळवत चमक दाखवली पण, त्याचा फायदा तिला उचलता आला नाही. यानंतर सबालेंकाने मागे वळून न पाहता फॉर्म कायम ठेवत सेट ६-३ असा जिंकत जेतेपद पटकावले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा