Advertisement

अश्विनची पुन्हा फिरकीची जादू चालली


अश्विनची पुन्हा फिरकीची जादू चालली
SHARES

मुंबई - भारताचा फिरकीपटू आर. अश्विनची पुन्हा एका फिरकीची जादू पाहायला मिळाली. आश्विननं 23 वेळी एका डावात 5 गडी बाद केले आहेत. कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी अश्विनने केलीय. अश्विनने शुक्रवारी भारताचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथचा विक्रमही मोडला. श्रीनाथने 67 कसोटी सामन्यात 236 गडी बाद केले असून, त्याचा विक्रम मोडत अश्विनने 237 गडी बाद केलेत. कपिल देव यांना एका डावात 23 वेळा 5 गाडी बाद करण्यासाठी 137 कसोटी सामने आणि 227 डाव खेळावे लागले होते. पण अश्विन ला 43 कसोटीत हा विक्रम मोडण्यात यश आलं. भारतीय टीमचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी 35 वेळा 5 गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे तर त्यानंतर हरभजन सिंग यानं 25 वेळा 5 गडी बाद केले आहेत.

संबंधित विषय
Advertisement