Advertisement

बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोनाची लागण

सायना नेहवाल थायलँड ओपन सुपर १००० टुर्नामेंटमध्ये सहभागी होणार आहे. ही स्पर्धा १२ ते १७ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.

बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोनाची लागण
SHARES

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला कोरोनाची लागण झाली आहे. सायना सध्या बॅडमिंटन स्पर्धा खेळण्यासाठी थायलंडला गेलेली आहे. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला रुग्णालयातच क्वारंटाईन रहावे लागणार आहे. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने याची पुष्टी केली आहे.

सायना नेहवाल थायलँड ओपन सुपर १००० टुर्नामेंटमध्ये सहभागी होणार आहे. ही स्पर्धा १२ ते १७ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. एचएस प्रणॉय या आणखी एका भारतीय बॅडमिंटनपटूचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे सध्या या दोघांनाही बँकॉक येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, भारतीय पथकात असलेला तिसरा बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप आणि सायना नेहवालचा पती या दोघांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिन्ही खेळाडूंची नावे थायलंड ओपन स्पर्धेतून मागे घेतली आहे. 

सायना मंगळवारी आपला पहिला सामना स्पर्धेच्या पहिल्या दिवशी खेळणार होती. मात्र, सायना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिची प्रतिस्पर्धी मलेशियाची खेळाडू किसोना सेल्वदुरे हिला वॉकओव्हर देण्यात आला. किसोना दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे. यासोबतच पी कश्यपचाही पहिला सामना कॅनडाच्या जेसन अँथनी हो-शुए सोबत होणार होता. जेसनलाही वॉकओव्हर मिळाला आणि तो देखील पुढील फेरीत गेला.हेही वाचा -

प्रदूषणाच्या पातळीत वाढ; मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी

प्रवाशांच्या हलगर्जीपणामुळं लॉकडाऊनमध्येही रेल्वे दुर्घटनांचे सत्र सुरूचRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement