खो- खो स्पर्धेत बालमोहनच्या मुलींची बाजी

 Shivaji Park
खो- खो स्पर्धेत बालमोहनच्या मुलींची बाजी
Shivaji Park, Mumbai  -  

शिवाजी पार्क - खो-खो जिल्हास्तरीय डिएसओ चॅम्पिअन स्पर्धेत बालमोहन विद्यामंदिरच्या मुलींनी बाजी मारलीय. बालमोहन विद्यामंदिरच्या 14 वर्षाखालील मुलींच्या गटाने बाजी मारली. विशाखा काशिद आणि रेणुका पाटील या दोघींनी उत्तम कामिगिरी करत 3-9 असा विजय मिळवला. बालमोहन विद्यामंदिर आणि आयइएस मॉर्डन हायस्कुल यांच्यात चांगलाच खेळ रंगला. दादरच्या शिवाजी पार्क येथील समर्थ व्यायाम मंदिर मैदानावर मंगळवारी हा सामना झाला. या वेळी बालमोहन शाळेचे क्रिडा शिक्षक विवेक अटाळे यांना विचारलं असता या मुलींनी विजयाची परंपरा कायम जपली असल्याची प्रतिक्रिया दिली.

Loading Comments