सिंधू, के. श्रीकांत बँक ऑफ बडोदाचे ब्रँड अॅम्बेसेडर

 Vidhan Bhavan
सिंधू, के. श्रीकांत बँक ऑफ बडोदाचे ब्रँड अॅम्बेसेडर
Vidhan Bhavan, Mumbai  -  

नरिमन पॉईंट - भारतातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने ऑलिम्पिकवारी करून आलेल्या पी. व्ही. सिंधू आणि के. श्रीकांत या बॅडमिंटनपटूंसोबत शनिवारी मुख्य प्रायोजकत्व करार केला.

या वेळी बँक ऑफ बडोदाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मयांक मेहता म्हणाले, ‘पी.व्ही. सिंधू आणि के श्रीकांत यांच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे त्यांचं नाव आज भारतातल्या घराघरात पोहचलं आहे' 'या दोघांचं नाव बँकेबरोबर जोडलं जात असल्याने खूप आनंद होत आहे' 'येत्या काही वर्षांमध्ये आमच्यातलं बंध अधिक दृढ होतील आणि हा सहयोग फलदायी ठरेल अशी अपेक्षा आहे’

Loading Comments