घाटकोपरमध्ये बास्केटबॉल शिबीर

 Ghatkopar
घाटकोपरमध्ये बास्केटबॉल शिबीर

घाटकोपर येथील आचार्य अत्रे मैदानात क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत बास्केटबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे . या शिबिरात 9 वर्षांपासून ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांनी मोठ्या संख्यने सहभाग घेतला आहे. 

जवळपास 100 मुली आणि 90 मुलांनी बास्केटबॉल प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेत आहेत. हे शिबीर शुक्रवार 28 एप्रिलपासून सुरू झाले असून, 5 मे पर्यंत संध्याकाळी 4.15 ते 5.45 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आतंरराष्ट्रीय पंच मनोज कोटीयन आणि प्रशिक्षक सचिन मठपती बास्केटबॉलचे प्रशिक्षक देणार आहेत. स्थानिक नगरसेविका राखी जाधव यांच्याहस्ते बास्केटबॉल प्रशिक्षण शिबिराचं उद्धाटन करण्यात आलं. यावेळी घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बागल, सचिव सुजीत झेंडे उपस्थित होते.

Loading Comments