Advertisement

दृष्टीहीन बनले 'मार्ग'दर्शक


SHARES

हाजी अली - दृष्टीहीन व्यक्तीला मार्गदर्शन करण्यासाठी डोळस व्यक्ती आपसूकच सरसावते, हे दृश्य अनेकदा पाहायला मिळते. याच्या अगदी उलट दृश्य रविवारी अनुभवायला मिळाले. जेथे दृष्टीहीन व्यक्तींनी डोळस व्यक्तींना मार्गदर्शन केले. ‘राऊंड टेबल इंडिया’ तर्फे दृष्टीहीनांच्या कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. एनएससीआय स्टेडियममध्ये या कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत 100 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत पहिला क्रमांक तीर्थसिंग अरोरा, दुसरा क्रमांक हितेश बोराले तर तिसरा क्रमांक हा शाहबाज खान याने पटकावला.

रॅली ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गाचा ब्रेल लिपीमध्ये नकाशा बनवण्यात आला होता. या नकाशात मार्गाची माहिती, चौक, लॅण्डमार्क, गतिरोधक, अंतर, यूटर्न अशी मार्गासंबंधीची महत्त्वाची माहिती देण्यात आली होती. या नकाशाच्या साहाय्याने दृष्टीहीन व्यक्ती चालकाच्या शेजारी बसून रॅलीचा मार्ग सांगत होता. रॅलीचा मार्ग काय आहे आणि कसा आहे, हे चालकाला माहित नव्हते. त्यामुळे संपूर्ण रॅलीमध्ये चालक दृष्टीहीन व्यक्तीच्या मार्गदर्शनाच्या साहाय्यानेच गाडी चालवत होता. या वेळी प्रसिद्ध अभिनेता सोहेल खान यांनीही उपस्थिती लावली होती. त्यांनीही स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा