Advertisement

चाईल्ड सेफ्टीचा संदेश देण्यासाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर


चाईल्ड सेफ्टीचा संदेश देण्यासाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर
SHARES
Advertisement

लहान मुलांवर होणारे अत्याचार, लैंगिक शोषण आणि बाल मजूर यावर आळा बसावा म्हणून रविवारी अंधेरीच्या बॉम्बे कॅम्ब्रीज शाळेतर्फे मॅरथॉन आयोजित करण्यात आली होती. यावेळी मॅरथॉनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी चाईल्ड सेफ्टीचा संदेश दिला. या मॅरथॉनमध्ये १२, १४, १६ आणि १८ वर्षाखालील एकूण दोन हजार सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थांसोबत शिक्षकदेखील सहभागी झाले होते. यावेळी शाळेच्या मुख्याधापिका पुनम अरोरा देखील उपस्थित होत्या.

लहान मुलांची सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र पालकांनीदेखील आपल्या मुलांककडे लक्ष द्यायला हवं, असं मॅरथॉनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement