फुटबॉल खेळणाऱ्यांसाठी एक चांगली संधी

 Borivali
फुटबॉल खेळणाऱ्यांसाठी एक चांगली संधी

तुम्हाला फुटबॉल खेळण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. रविवारी 4 जूनपासून सुरुवात होणारी ही फुटबॉल स्पर्धा बोरिवलीच्या सेंट फ्रान्सिक मैदानावर खेळवण्यात येणार आहे. बोरिवली स्पोर्टस् फाउंडेशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आयोजकांनी नवीन प्रतिभावान खेळाडूंना स्पर्धा खेळण्याची आणि अधिक स्पर्धात्मक बनवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

बोरिवली स्पोर्टस फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत यावेळी 8 संघाचा सहभाग असणार आहे. या आधी दहिसर ते बोरिवली विभागातील खेळाडूंना या स्पर्धेत समावेश होता. यावर्षी सर्व संघामध्ये मकर अनुभवी खेळाडूंचा समावेश असणा आहे. ज्यामध्ये नागेंद्र वाकारे, कॉलिन अब्रान्चेस, डेन परेरा, सनी ठाकूर, ऍगेलो पिकार्डो आणि शिद्धारीर्थ नायक यांचा समावेश आहे. गतविजेता संघ टायगर एससी आणि उपविजेता संघ चॅलेंजर एफसी यावेळी पुन्हा विजेतेपदासाठी आव्हान देणार आहेत.

या फुटबॉल स्पर्धेच्या एकूण 8 संघात टायगर एससी, चॅलेंजर एफसी, आय सी युनायटेड एसए, शेलार एफसी, फ्लिट फ्लोअर्स, फायर ड्रागन, मिलन क्लब आणइ मेरीलॅंड युनायटेड यांचा समावेश असणार आहे.

Loading Comments