Advertisement

भारत पेट्रोलियमची सेंट्रल रेल्वेवर ३-१ ने मात


भारत पेट्रोलियमची सेंट्रल रेल्वेवर ३-१ ने मात
SHARES

भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) पिछाडीवरून मुसंडी मारत सेंट्रल रेल्वेचा ३-१ असा पाडाव करून बाॅम्बे गोल्ड कप हाॅकी स्पर्धेत विजयाची नोंद केली. चर्चगेट येथील एमएचएएल-महिंद्रा स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात मुंबई सुपर लीगच्या विजेत्या सेंट्रल रेल्वेने अाश्वासक सुरुवात केली. मोहम्मद निझामुद्दीनने विनित कांबळेच्या पासवर अाठव्या मिनिटाला गोल करत सेंट्रल रेल्वेला अाघाडी मिळवून दिली.


स्टार अाणि अनेक अाॅलिम्पियन हाॅकीपटूंचा भरणा असलेल्या बीपीसीएलने सुरेख कामगिरी करत सांघिक खेळ केला. बीपीसीएलने सेंट्रल रेल्वेच्या गोलक्षेत्रात मजल मारत अनेक हल्ले चढवले, पण गोलकिपर अवधूत सोलंकर याने त्यांचे अाक्रमण परतवून लावले, त्याने देविंदर वाल्मिकी अाणि अामीर खान यांचे प्रयत्न हाणून पाडले.


बीपीसीएलचे लागोपाठ तीन गोल

सेंट्रल रेल्वेच्या बचावपटूंनी केलेल्या चुकांमुळे बीपीसीएलला ४३व्या मिनिटाला खाते खोलण्याची संधी मिळाली. मिळालेल्या पेनल्टी काॅर्नरचा लाभ उठवत दिपसन तिर्की याने पहिला गोल केला. त्याच्या पाच मिनिटानंतर अामीर खानने दुसरा गोल करत बीपीसीएलला अाघाडी मिळवून दिली. अाॅलिम्पियन तुषार खांडेकर याने ६५व्या मिनिटाला अाणखी एक गोल करून बीपीसीएलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.


पीएनबीकडून इंडियन एअर फोर्सचा धुव्वा

ड गटातील अन्य सामन्यात, दिल्लीच्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) दिल्लीच्याच इंडियन एअर फोर्सचा ४-० असा धुव्वा उडवला. गगनदीप सिंग ज्युनियर (११व्या अाणि ४८व्या मिनिटाला पेनल्टी काॅर्नरवर), शमशेर सिंग (२६व्या मिनिटाला) अाणि गगनदीप सिंग (५९व्या मिनिटाला) यांनी गोल करत पीएनबीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा