मुंबईत 'ब्रेव्ह मार्शल आर्ट'चा थरार!

मुंबईत 'ब्रेव्ह मार्शल आर्ट'चा थरार!
मुंबईत 'ब्रेव्ह मार्शल आर्ट'चा थरार!
See all
मुंबई  -  

जगप्रसिद्ध असलेल्या ब्रेव मार्शल आर्ट स्पर्धेचे आयोजन मुंबईत पहिल्यांदाच करण्यात आले. डब्लूडब्लूई सारखीच ही स्पर्धा होती. या स्पर्धेला मुंबईतील तरुणांनी उपस्थिती दाखवली होती. वरळीतलल्या एनएससीआय स्टेडिअमवर रविवारी खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेला मुंबईकरांचाही भरभरून प्रतिसाद मिळाला.विशेष म्हणजे या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी देखील सहभाग घेतला होता. यास्पर्धेचे आकर्षण ठरला तो मुंबईकर चैतन्य गवळी. चैतन्य 61 किलो वजनी गटात खेळत होता. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे हिने देखील हजेरी लावली होती.


हा आपल्यासाठी मोठा इव्हेंट होता, मार्शल आर्टचे करिअर करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. अनेक महिन्यांपासून सराव करत आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या फाईट आपण खेळल्या आहेत. या खेळात योग्य आहार आणि सराव करत रहाणं गरजेचं आहे. आज विजय मिळवता आला नाही तरी वेगळे काहीतरी शिकायला मिळाले

- चैतन्य गवळी, मुंबईकर खेळाडू

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.