भारताकडे उत्कृष्ट गोलंदाज - ब्रेट ली

 Nariman Point
भारताकडे उत्कृष्ट गोलंदाज - ब्रेट ली
भारताकडे उत्कृष्ट गोलंदाज - ब्रेट ली
भारताकडे उत्कृष्ट गोलंदाज - ब्रेट ली
भारताकडे उत्कृष्ट गोलंदाज - ब्रेट ली
भारताकडे उत्कृष्ट गोलंदाज - ब्रेट ली
See all
Nariman Point, Mumbai  -  

भारतीय क्रिकेटला उत्कृष्ट गोलंदाज लाभल्यामुळे भारताला त्याचा नक्कीच फायदा होईल असे मत ऑस्ट्रेलियाचा निवृत्त वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले. नवोदीत गोलंदाजांसाठी फायदेशीर अशा ‘बॉलिंग मास्टर’ या अॅपचे लीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी तो बोलत होता. यावेळी ब्रेट लीने बुमराहचे देखील तोंडभरून कौतुक केले. 

बुमराहच्या यॉर्करने आपल्याला प्रभावित केल्याची प्रतिक्रिया देत 'ली'ने उमेश यादव, इशांत शर्मा यांच्या गोलंदाजीचे तोंडभरून कौतुक केले. एकूणच भारताकडे चांगल्या दर्जाच्या गोलंदाजांचा भरणा असल्याने त्याचा फायदा भारतीय संघाला नक्की होणार असंही ब्रेट ली म्हणाला.

यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होता. त्यानेही उमेश यादव जितकी अधिक गोलंदाजी करेल, त्याचा फायदा भारताला होईल असे सांगितले. त्याचबरोबर देशाबाहेर खेळणे हे मोठे आव्हान असते. त्यामुळेच परदेशात विजय मिळवणे खूप आव्हानात्मक असल्याचे सांगत विराट कोहली आणि त्याचा संघ सध्या फॉर्ममध्ये आहे. तरीदेखील त्यांच्यासमोरील मुख्य आव्हान परदेशात विजय मिळवण्याचे असल्याची प्रतिक्रिया ब्रेट ली याने दिली.

Loading Comments