Advertisement

खूप वर्ष मेहनत केल्यानंतर ‘बीडब्ल्यूएफ’चं विजेतेपद पटकावलं- पी व्ही. सिंधू

या यशस्वी कामगिरीबद्दल सहारा इंडिया परिवारातर्फे मुंबईत एका शानदार कार्यक्रमात पी. व्ही सिंधूला गौरवण्यात आलं.

खूप वर्ष मेहनत केल्यानंतर ‘बीडब्ल्यूएफ’चं विजेतेपद पटकावलं- पी व्ही. सिंधू
SHARES

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिनं इतिहासातील अपयशावर मात करत स्वित्झर्लंड इथं झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरलं आहे. पी.व्ही. सिंधूनं जपानच्या नोझोमी ओकुहाराला २१-, २१-७ असा सरळ पराभव करीत धूळ चारली आणि ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.

यशस्वी कामगिरी

या यशस्वी कामगिरीबद्दल सहारा इंडिया परिवारातर्फे मुंबईत एका शानदार कार्यक्रमात पी. व्ही सिंधूला गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेता अभिषेत बच्चन, प्रेम चोप्रा यांसारख्या अनेक कलाकार सहभागी झाले होते. त्यावेळी सहारा इंडिया परिवाराचे अध्य़क्ष सुब्रतो रॉय यांनी पी. व्ही. सिंधुचा सन्मान केला.

कौशल्यावर सकारात्मक परिणाम 

'भारताची परदेशी प्रशिक्षक किम जि ह्यून यांनी माझ्या खेळाचा अभ्यास करून अनेक बदल सुचवले. पी. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना या बदलांचा माझ्या कौशल्यावर सकारात्मक परिणाम झाला', असं पी. व्ही. सिंधूनं यावेळी म्हटलं. तसंच, 'हे विजेतेपद मिळवण्यासाठी मला खूप वर्ष मेहनत घ्यावी लागली', असंही तिनं म्हटलं.

दोनवेळा हुलकावणी

स्वित्झर्लंड इथं झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूनं तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सिंधूनं उपात्यपूर्व फेरीत चीनच्या चेन यू फेईचं आव्हान सहज परतवून लावलं होतं. सिंधूनं फेईचा २१-, २१-७ असा सरळ पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदानं सिंधूला दोनवेळा हुलकावणी दिली होती. मात्र मागील अपयशावर मात करीत सिंधूनं अखेर जेतेपदाला गवसणी घातली. सिंधूनं जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदकावर नाव कोरलं. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.हेही वाचा -

महाराष्ट्रातही लागू होणार NRC?

आयर्लंडने दिला मुंबईतील जुन्या नकाशाचा खजिनाRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा