Advertisement

महाराष्ट्रातही लागू होणार NRC?

राज्यात अवैधरित्या स्थलांतरित झालेल्यांना रोखण्यासाठी आता आसामपाठोपाठ महाराष्ट्रतही राष्ट्रीय नागरिकता नोंदणी म्हणजेच एनआरसी ( नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन) लागू होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातही लागू होणार NRC?
SHARES

राज्यात अवैधरित्या स्थलांतरित झालेल्यांना रोखण्यासाठी आता आसामपाठोपाठ महाराष्ट्रतही राष्ट्रीय नागरिकता नोंदणी म्हणजेच एनआरसी ( नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन) लागू होण्याची शक्यता आहे. यासाठी नवी मुंबईत पहिले डिटेन्शन सेंटर स्थापनही करण्यात येणार असल्याचं वृत्त एका इंग्रजी दैनिकानं दिलं आहे. 

नेरुळ येथे अटक केंद्र बनवण्यासाठी ३ एकरचा भूखंड उपलब्ध करुन द्यावा, असं पत्र राज्याच्या गृहखात्याने सिडकोला पाठवलं आहे.  आसाममध्ये नुकतेच  एनआरसीची अंतिम यादी प्रकाशित झाली आहे. या यादीत आसाममधील१९ लाख लोकांचा समावेश करण्यात आलेला नाही. म्हणजे या नागरिकांना परदेशी नागरिक मानण्यात आलं आहे. आता महाराष्ट्रातही एनआरसी लागू होण्याची चिन्हे दिसत आहेत. देशातील सर्व महत्वाच्या शहरांमध्ये डिटेन्शन सेंटर्स उभारणं आवश्यक असल्याचं केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरूवातीला म्हटलं होतं. 

मुंबईमध्ये अवैधरित्या अनेक बांगलादेशी राहत असल्याचा दावा याआधी शिवसेनेने केला आहे. या ठिकाणीही एनआरसी लागू व्हावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली होती. आसाममध्ये खऱ्या नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी एनआरसीची गरज होती. त्यामुळे आम्ही एनआरसीच्या निर्णयाचे स्वागत करतो. अशी पावले मुंबईतही उचलली जावीत असं सावंत यांनी म्हटलं होतं. 


हेही वाचा  -

काँग्रेससाेबत युती नाहीच, स्वबळावर लढवणार निवडणूक - प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादीला आणखी मोठा धक्का, भास्कर जाधव शिवसेनेत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा