अंधेरीत रंगणारी कॅरम स्पर्धा, लाखोंची बक्षिसे


SHARE

सार्थ प्रतिष्ठान अाणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनजर जिल्हा कॅरम संघटनेच्या संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबरपासून जोड जिल्हा कॅरम स्पर्धा अायोजित करण्यात अाली अाहे. अंधेरीतील शहाजी राजे क्रीडा संकुलात रंगणाऱ्या या स्पर्धेत विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार अाहेत.


काजल कुमारी, रियाझ अलीला अग्रमानांकन

या स्पर्धेत महिलांमध्ये मुंबईच्या काजल कुमारीला तर पुरुषांच्या एकेरी गटात मुंबईच्या रियाझ अकबर अलीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. महिलांमध्ये अायेशा मोहम्मद व प्रीती खेडेकर यांना अनुक्रमे दुसरे अाणि तिसरे मानांकन असेल. पुरुषांमध्ये पंकज पवार अाणि संदीप देवरुखकर यांना अनुक्रमे दुसरे अाणि तिसरे मानांकन देण्यात अाले अाहे.


३६६ खेळाडूंचा सहभाग

खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पालघर अाणि मुंबई उपनगरातील खेळाडू सहभागी होणार अाहेत. महिला गटात ३८ तर पुरुषांमध्ये ३२८ खेळाडूंनी अापला सहभाग नोंदवला अाहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtrcarromassociation.com या संकेतस्थळावर सामन्यांचे लाईव्ह निकाल उपलब्ध असतील.

संबंधित विषय
ताज्या बातम्या