सेंट्रल रेल्वेच्या महिला, पुरूष संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

 Bandra west
सेंट्रल रेल्वेच्या महिला, पुरूष संघांचा अंतिम फेरीत प्रवेश
Bandra west, Mumbai  -  

माऊंट कार्मेल रिंक हॉकी टूर्नामेंट 2017 च्या अंतिम फेरीत सेंट्रल रेल्वेच्या महिला आणि पुरूष संघाला दुहेरी विजेतेपद पटकाविण्याची उत्तम संधी मिळाली आहे. कारण या दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

माऊंट कार्मेल चर्च कंपाऊंड, वांद्रे येथे झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यात मध्य रेल्वेच्या अनूप वाल्मिकीने उत्कृष्ट कामगिरी करत यूके युनायटेड संघाचा 5-3 फरकाने पराभव केला. या सामन्यात वाल्मिकीने चमकदार कामगिरी करत चार गोल केले.

याआधी महिला उपांत्य फेरीच्या सामन्यात मध्य रेल्वे संघाने सी व्ह्यू एससी संघाला 2-0 अशा फरकाने मात दिली. मध्ये रेल्वेच्या कविता.एस. आणि सरिता मिनज या दोघींनी प्रत्येकी एक गोल केला, तर सी व्ह्यू च्या एकाही खेळाडूला गोल करण्यात यश आले नाही.

Loading Comments