Advertisement

चामींडा, वासीम देणार क्रिकेटचे धडे


चामींडा, वासीम देणार क्रिकेटचे धडे
SHARES

ज्वाला फाऊंडेशनतर्फे पहिल्यांदाच क्रिकेट कॅम्पचं आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प 15 ते 20 दिवस चालणार आहे. मुंबई जीमखान्यात याचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये श्रीलंकेचा उत्कृष्ट गोलंदाज चामींडा वास आणि भारताचा माजी स्टार फलंदाज वसीम जाफर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना क्रिकेटचे धडे दिले जात आहेत. यात 14 वर्ष आणि 16 वर्ष या वयोगटातील संघाला फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणाचं कौशल्य, स्पीन बॉलिंग, फिटनेस, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी काय केलं पाहिजे, याचं प्रशिक्षण देण्यात येईल. या सर्व गोष्टींवर वसीम जाफर लक्ष ठेवणार आहेत. या प्रशिक्षणासाठी परदेशी प्रशिक्षक देखील येणार असल्याचे ज्वाला फांऊडेशनचे संस्थापक ज्वाला यांनी सांगितले.

यामध्ये एकूण 165 मुलांनी सहभाग घेतला होता. त्यातून 35 मुलांची निवड झाली आहे. ज्वाला फाऊंडेशनतर्फे पहिल्यांदाच असा उपक्रम राबवला जात आहे. या प्रशिक्षणामध्ये विनायक सामंत आणि संतोष शिंदे हे दोघेही माजी रणजीपटू वसीम जाफर यांना मदत करणार आहेत. खेळाडू जर 25 ते 30 टक्के तयार असतील तर, त्यांना नक्कीच किमान 60 ते 70 टक्क्यांपर्यंत तयार करू, असे वक्तव्य माजी फलंदाज वासीम यांनी केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा