पोलो खेळात सिटी वॉक संघाची बाजी

 Mahalaxmi
पोलो खेळात सिटी वॉक संघाची बाजी

महालक्ष्मी - देना बँक एमजी अँड जी एरियो पोलो कपच्या फायनलमध्ये सिटी वॉक संघाने वी पोलो संघाचा 7-6 (अतिरिक्त चुक्कर गोल्डन गोल) असा पराभव करत विजय मिळवला.

महालक्ष्मी रेस कोर्सच्या एआरसी पोलो ग्राऊंडमध्ये 10 मार्चला हा सामना खेळला गेला. 6 मार्चला सुरू झालेल्या या टूर्नामेंटमध्ये 6 संघांनी सहभाग घेतला होता. पोलो एक असा खेळ आहे जो घोंड्यावर बसून खेळला जातो. यात प्रतिस्पर्धी विरुद्ध गोल करायचा असतो. या खेळाला ब्रिटीश काळात फार महत्त्व होते. या खेळात खेळाडू एक प्लास्टिक किंवा लाकडाच्या हॉकीने चेंडू प्रतिस्पर्धीच्या गोलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. या खेळातील संघात प्रत्येकी 4 खेळाडू असतात.

Loading Comments