मॅरेथॉनमध्ये दिव्यांगांचाही समावेश

मुंबई - सध्या मुंबईत पडलेल्या बोचऱ्या थंडीला ही न घाबरता मुंबईकर मॅरेथॉनमध्ये धावत आहेत. तरुणांसह वयोवृद्धांचा ही समावेश मॅरेथॉनमध्ये पाहायला मिळतो आहे. त्यासोबतच दिव्यांगांचाही नेहमीप्रमाणे मॅरेथॉनमध्ये मोठा सहभाग आहे. सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी दिव्यांगांच्या मॅरेथॉनला सुरुवात झाली. सीएसटीपासून सुरु झालेली मॅरेथॉन मेट्रो सिनेमाजवळ संपली. या मॅरेथॉनसाठी 2.4 किलोमीटर इतकं अंतर ठेवण्यात आलं होतं. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी महादेव जानकर, शायना एनसी देखील उपस्थित होते. यंदाही या शर्यतीला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Loading Comments