Advertisement

आतंरशालेय टेनिस स्पर्धेत कायरा आणि ध्रुवचे वर्चस्व


आतंरशालेय टेनिस स्पर्धेत कायरा आणि ध्रुवचे वर्चस्व
SHARES

प्रबोधन अांतरशालेय क्रीडा महोत्सवात टेनिस प्रकाराच्या १० वर्षांखालील मुलांच्या गटात ध्रुव सुरेशने तर १४ वर्षांखालील मुलींमध्ये कायरा शेट्टी यांनी अापापली छाप पाडत अजिंक्यपद पटकावले. गोरेगाव येथील प्रबोधन क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत पवार पब्लिक स्कूलच्या बर्फीवाला इंटरनॅशनल स्कूलच्या चैतन्य अालम याला ८-५ असे हरवून विजयावर मोहोर उमटवली. कायरानं ठाकूर इंटरनॅशनलच्या साझ ठाकूर हिला ८-३ असे हरवून अापले वर्चस्व कायम राखले.


पवार पब्लिक स्कूलचे वर्चस्व


पवार पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी या स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. १० वर्षांखालील मुलांच्या वयोगटात ध्रोन सुरेशने पोदारच्या विराज सिंघचा ८-५ असा पराभव केला. ऋशिकेश अय्यर (आर्य विद्यामंदिर) याने १२ वर्षे वयोगटात वेद ठाकूर (राधाकृष्णन स्कूल) याला ८-४ असे हरविले तर १४ वर्षे वयोगटात अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या दोन खेळाडूंमध्ये रंगलेल्या लढतीत क्रिश वाघानीने विहान मंगतचा ८-१ असा पाडाव केला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा