ग्रँटरोड - ग्रँटरोडमधील सुंदरता हायस्कूलमधील इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या दिव्येश सकपाळ यानं कॅरम स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं. पब्लिक स्कूल कॅरम असोसिएशन इंडिया यांच्यावतीनं राष्ट्रीय स्तरावर राजस्थानमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. संस्थेचे विश्वस्त दीपक मेस्त्री यांनी दिव्येशचं कौतूक करत त्याचा सत्कार केला. दरम्यान कॅरम स्पर्धेत निवड करण्यासाठी आणि प्रत्येक वेळेला अमूल्य मार्गदर्शन करण्यासाठी दिव्येशनं क्रीडा शिक्षकांचे आभार मानलेत.