Advertisement

बोरिवलीच्या डॉन बॉस्को संघाचा डबल धमाका


बोरिवलीच्या डॉन बॉस्को संघाचा डबल धमाका
SHARES

नॉर्थ मुंबई क्रीडा महोत्सव स्पर्धेतील सबर्बन फुटबॉल टुर्नामेंटमध्ये डॉन बाॅस्को संघाने विजय मिळवला. या संघाने १६ आणि १४ वर्षांखालील गटात शानदार खेळाचं प्रदर्शन करत दोन्ही गटात विजय मिळवला. पोईसर जिमखान्यातर्फे आयोजित ही स्पर्धा बुधवारी पोईसर जिमखाना येथे खेळवण्यात आली.  


दोन्ही वयोगटात विजय

१६ वर्षांखालील गटात सेंट झेवियर्स विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या लढतीत बोरिवलीच्या डॉन बॉस्को संघाने २-० ने आगेकूच करत विजय मिळवला. डॉन बॉस्कोच्या ज्युनियर संघाने १४ वर्षांखालील गटात गोरेगावच्या गोकुळधाम संघाला २-० अशा फरकाने परभूत करत सामन्यात आपलं वर्चस्व राखलं.

यावेळी १६ वर्षांखालील गटात झालेल्या इतर सामन्यात दहिसरच्या सेंट फ्रान्सिक डिअसीसने रुस्तमजी इंटरनॅशनल संघाचा २-० ने पराभव करत विजय मिळवला.


इतर सामन्यांत कुणी मारली बाजी?

याआधी झालेल्या १४ वर्षांखालील गटात रुस्तमजी इंटरनॅशनल संघाने सेंट फ्रान्सिक अ डिअसीसला ३-० अशा फरकाने पराभूत केलं. सेंट फ्रान्सिक ब संघाने कांदिवलीच्या स्वामी विवेकानंद संघाला ३-० अशा फरकाने पराभूत करत एकतर्फी विजय मिळवला. शेवटच्या प्राईम अकादमी विरुद्ध झालेल्या लढतीत गोरगावमधील लक्षधामने १-० ने विजय साकारला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा