वांद्रे - कॉनसीसाओ रॉड्रिग्स इंजिनिअरिंग महाविद्यालयातील स्टुडन्ट ऑफ रोट्रॅक्ट क्लब तर्फे रविवारी ड्रीमरनचे आयोजन करण्यात आले होते.या ड्रीमरनमध्ये 290 हून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. ड्रीमरनचं उद्घाटन रोट्रॅक्ट क्लब ऑफ बांद्राचे रतन मुखी यांच्याहस्ते करण्यात आलं. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदित्य श्रॉफ यांनी देखील हजेरी लावली होती.
6 किलोमीटरच्या या ड्रीमरनमध्ये 15 वयोगटातील मुलांनीही सहभाग घेतला होता. या ड्रीमरनमध्ये सोनाली म्हापेकर पहिली, ख्रिस्तिना मायकन दुसरी तर रिटा मौर्य तिसरी आली. मुंबई वाहतूक विभागातील पोलिसांसह, होली रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.