Advertisement

मुंबई मॅरेथॉनसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या


मुंबई मॅरेथॉनसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या
SHARES

मुंबई - स्टॅण्डर्ड चार्टर्डच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मुंबई मॅरेथॉनला अवघे काही तास उरलेत. या मॅरेथॉनसाठी आता पश्चिम रेल्वेही सज्ज झाली आहे. 'परे'ने तर या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी विशेष गाड्या सोडल्या आहेत. 14 आणि 15 जानेवारी या दोन दिवशी 'परे'ने या स्पेशल रेल्वे सोडल्या आहेत.

विरार वरून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या दोन गाड्या 14 तारखेच्या मध्यरात्री सोडण्यात येणार आहेत. पहिली स्पेशल लोकल ट्रेन विरारवरून 2.45 ला सुटणार आणि चर्चगेटला 4.23 पोहोचणार, तसेच दुसरी स्पेशल ट्रेन 3.05 ला विरार वरून सुटणार आणि 4.43 ला चर्चगेटला पोहोचणार आहे.

मध्य रेल्वेनेही कल्याण आणि पनवेलवरून मॅरेथॉनसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय. कल्याणहून पहाटे तीन वाजता ही विशेष ट्रेन निघेल, ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला पहाटे साडेचार वाजता पोहोचेल. तर पनवेलवरून पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही विशेष ट्रेन सुटेल ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला पहाटे साडेचार वाजता पोहोचेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा