मुंबई महापौर बुद्धिबळ : राजा रुत्विकचा युक्रेनचा ग्रँडमास्टरला धक्का


SHARE

फिडे मास्टर राजा रुत्विक याने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत पाचव्या फेरीत युक्रेनचा ग्रँडमास्टर नेवेराॅय वॅलेरिटी याला पराभवाचा धक्का दिला. वांद्रे-कुर्ला संकुलातील माउंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू असलेल्या मुंबई महापौर अांतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत राजा रुत्किकने (इलो रेटिंग गुण २२९६) किंग नाइटने खेळाची सुरुवात करत अापला भक्कम बचाव ठेवला. अखेर ७६व्या चालीत युक्रेनच्या ग्रँडमास्टरला पराभूत करत सर्वांची मने जिंकून घेतली.


अाक्रमक खेळामुळे विजय

१९व्या चालीत दोघांनी एकमेकांच्या प्याद्या घेतल्यानंतर ३०व्या चालीला युक्रेनच्या ग्रँडमास्टरने सामना बरोबरीत राखण्यासाठी प्रयत्न केला. पण दोघांनी वजिरा-वजिरी केल्यानंतर राजाने उंटाच्या साहाय्याने हल्ला चढवला. अाक्रमक खेळ केल्यामुळे राजाला ७३व्या चालीत जिंकण्याची संधी होती. अखेर ७६व्या चालीला वॅलेरिटी याने अापला पराभव मान्य केला.


अर्जुनचा सुरेख फाॅर्म

फिडे मास्टर ई. अर्जुन याने अापला सुरेख फाॅर्म कायम राखत अव्वल मानांकित युक्रेनचा ग्रँडमास्टर क्रॅविस्तिव मार्टिन याला सामना बरोबरीत सोडवण्यास भाग पाडले. फ्रेंच बचाव पद्धतीपासून सुरू झालेल्या या लढतीत दोघांनीही एकमेकांचे मोहरे टिपण्यावर भर दिला. अखेर दोघांनीही ४२व्या चालीनंतर सामना बरोबरीत सोडवण्याचे मान्य केले.


हेही वाचा -

नुबेरशाह शेखने जिंकली सतीश सबनीस जलद बुद्धिबळ स्पर्धा

मुंबईत रंगणार राष्ट्रीय अंध बुद्धिबळ स्पर्धा

संबंधित विषय
ताज्या बातम्या