Advertisement

अनुभवी बारटक्केला 'चेस टुर्नामेंट'मध्ये कडवे आव्हान


अनुभवी बारटक्केला 'चेस टुर्नामेंट'मध्ये कडवे आव्हान
SHARES

'एसबीआय लाईफ फिडे रेटींग चेस टुर्नामेंट'मध्ये १५ वर्षांच्या कृष्णा मलयने तिसऱ्या मानांकीत अमरदीप बारटक्केला आक्रमक लढत देत सामना बरोबरीत आणला. ही स्पर्धा रशियन कल्चर सेंटर येथे खेळवण्यात आली. मलयने आक्रमक आणि सुंदर खेळ करत अमरदीपला दबावाखाली आणले. अमरदीपला एकही संधी न देता मलयने आपल्या खेळावर वर्चस्व राखले. अमरदीपने आक्रमकपणा दाखवत ५० चाली रचल्या, पण कृष्णाच्या खेळापुढे त्यांची डाळ शिजली नाही.


सामना बरोबरीत

चौथ्या बोर्डवर झालेल्या चौथा मानांकीत संतोष खेडेकर विरुद्ध प्रजापल शेंद्रे मधील सामना देखील २.५-२.५ अशा गुण संख्येने बरोबरीत ठरला. खेळाच्या सुरुवातीलाच दोन्ही खेळाडूंकडून संथ गतीने चाली रचण्यात आल्या. काही वेळानंतर संतोषने आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मिळवली. पण शेवटच्या वेळेत सामना बरोबरीत राहीला. यानंतर झालेल्या लढतीत फिडे मास्टर सजनदास जोशी, गोपाल राठोड आणि केतन पाटील यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या खेळाडूसोबत तीनने आघाडी घेत विजय साकारला. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा